सर्वेक्षणवरील प्रक्रिया चालू रहाणार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – संभल येथील पूर्वीचे श्री हरिहर मंदिर आताची जामा मशीद असल्याच्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने या वास्तूचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. याविरोधात मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे या वास्तूविषयीचे सर्वेक्षण चालू रहाणार आहे.
१९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वेक्षण केले होते. २४ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या वेळी मुसलमानांकडून हिंसाचार करण्यात आला होता. यात ४ मुसलमानांचा मृत्यू झाला होता. यानंतर ८ जानेवारी २०२५ या दिवशी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन सर्वेक्षणाला स्थगिती दिली. तसेच सर्व विरोधी पक्षांकडून उत्तरे मागितली गेली.