
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सनातन धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करणार्या हिंदु धर्मविरांना ‘हिंदु राष्ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा चालू केली आहे. या शंखनाद महोत्सवात १९ मे या दिवशी देहली येथील ‘चाणक्य फोरम’चे संस्थापक मेजर गौरव आर्या (निवृत्त) यांना आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.