सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ सत्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १९ मे (वार्ता.) – राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. पाकिस्तानला भारताने वारंवार क्षमा केली आहे. युद्धात ३ वेळा पराभव केल्यानंतरही पाकिस्तानने भारतावर पलटवार केला. ‘शत्रूला वारंवार क्षमा करू नये’, ही सनातन धर्माची शिकवण आहे. पाकिस्तानलाही वारंवार क्षमा न करता ठोकून काढले पाहिजे. हीच युद्धनीती आहे. शत्रूचा कणा मोडल्यानंतरच देशात शांती नांदेल, असे वक्तव्य देहली येथील ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक मेजर गौरव आर्य (निवृत्त) यांनी केले. १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘सनातन राष्ट्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य’ या सत्रात मान्यवरांनी विविध विचार मांडले.
Major Gaurav Arya @majorgauravarya roars at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav in Goa : "Chhatrapati Shivaji Maharaj is the need of the hour!" pic.twitter.com/9NdUQNwhwR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2025
यामध्ये मेजर गौरव आर्य (निवृत्त) यांनी ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर विचार मांडले. या वेळी व्यासपिठावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, ‘पंजाब गोरक्षक दला’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश प्रधान, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या आध्यात्मिक शोध विभागाचे प्रमुख सदस्य श्री. शॉन क्लार्क, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु सिरियाक वाले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्याचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

या वेळी मेजर गौरव आर्य म्हणाले, ‘‘साधूसंतांच्या रक्षणासाठी प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. मोगलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग यांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभु श्रीराम पुन्हा अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार होत आहे
हिंदु जनजागृती समितीचे कार्य समाजाला दिशादर्शक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती
मुसलमानांना मदरशांमध्ये, तर इसायांना चर्चमध्ये धर्मशिक्षण मिळते; मात्र हिंदूंना धर्मशिक्षणाची व्यवस्था नाही. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग चालू केले. सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत. म.फी. हुसेन याने भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्ने चित्र काढल्याच्या विरोधात समितीने देशव्यापी आंदोलन छेडले. त्यामुळे हुसेन यांच्या विरोधात देशभरात १ सहस्र २०० तक्रारी नोंदवल्या जाऊन त्यांना देश सोडून जावे लागले. हिदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाद्वारे देशभरातील १ सहस्रहून अधिक संघटना धर्मकार्याशी जोडल्या आहेत. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून या संघटनांचे एकत्रित कार्य चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य राष्ट्राला दिशा देणारे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
‘हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक आहे. हिंदू बलशाली व्हायला हवेत. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले. त्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या संघटनाला प्रारंभ केला. सनातनच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची प्रचिती आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असे एकमात्र व्यक्ती आहेत, जे राष्ट्राला दिशा देण्यासाठी कार्य करत आहेत. हिंदूंना बळशाली करण्यासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत.
‘ओम प्रमाणपत्राद्वारे’ हिंदू ग्राहकांचे संघटन आवश्यक !हिंदू भारतात अल्पसंख्य झाले तर त्यांना जाण्यासाठी जगात हिदूंचा एकही देश नाही. त्यामुळे येणार्या काळात दिशात हिंदूंची सत्ता असायला हवी. सद्यस्थितीत मुसलमानांनी भारतातील अर्थकारणावर पकड घट्ट केली आहे. त्यामुळे हिंदूंनी हिंदूंसमवेत आर्थिक व्यवहार करायला हवा. यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’द्वारा हिंदू उद्योजकांनी ‘हिंदू शुद्धता मानक प्रमाणपत्र’द्वारे हिंदू ग्राहकांचा संघटन होणे आवश्यक असल्याचे रणजित सावरकर म्हणाले. |
सनातन धर्माचा विदेशात प्रसार करण्याच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सिरियाक वालिये, एस्.एस्.आर्.एफ्.
सध्या जागतिक स्तरावर अस्थिर वातावरण आणि नकारात्मकता वाढली आहे, प्रत्येकाला भविष्यकाळ कसा असेल ? याविषयी चिंता आहे. यावर सनातन धर्म हेच उत्तर आहे. ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) कार्य जगाच्या ५ खंडांमधील ७० हून अधिक देशांमध्ये चालू असून, अध्यात्म विषयावर ५ सहस्र प्रवचने आणि अभ्यासवर्ग झाले आहेत. १ लाखाहून अधिक लोकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या ५० साप्ताहिक ऑनलाईन सत्संग ९ भाषांमध्ये चालू आहेत. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने चालू आहे.
सनातन धर्माचे प्रत्येक अंग सात्त्विकतेने भरलेले ! – शॉन क्लार्क, आध्यात्मिक शोध विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
श्रीराममंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीराममंदिर परिसरातील सात्त्विकतेत वाढ होत आहे, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे करण्यात आलेल्या विविध प्रयोगांमधून लक्षात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पहाणार्या दर्शकांमधील नकारात्मकता ६० टक्क्यांनी अल्प झाली, तर सकारात्मकता १४५ टक्क्याने वाढल्याचे संशोधनातून लक्षात आले. महाकुंभपर्वात ५ मिनिटांच्या अमृत स्नानाने स्नान करणार्यांचे सकारात्मक वलय ६० टक्के ते १३३ टक्के एवढ्या प्रमाणात वाढले. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार, शास्त्रीय गायन यांमुळे सात्त्विकता, भक्ती वाढते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे अशा प्रकारे ६०० हून अधिक प्रयोग करण्यात आले आहेत. या संशोधन कार्यात हिंदूंनी सहभागी व्हावे.
गोवा सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा ! – सतीश प्रधान, संस्थापक, पंजाब गौरक्षा दल
‘गोमाता तथा सनातन राष्ट्र’ या विषयावर बोलतांना श्री. सतीश प्रधान म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने पाकच्या विरोधात ऑपरेशन ‘सिंदूर’ राबवले. भारतीय सैनिकांनी मोठा पराक्रम केला आहे. गोव्याची ही परशुरामाची भूमी आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी गोमाता स्थापित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा. श्रीरामाने वानरांना, तर श्रीकृष्णाने गोपींना संघटित करून धर्मकार्य केले, त्याप्रमाणे देशातील हिंदूंनी संघटित होऊन धर्मकार्य करायला हवे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारातून धर्मसंस्थापनेचे भव्य कार्य ! – सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारातून धर्मसंस्थापनेचे भव्य कार्य सनातन संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्मप्रसार केला आहे. मनुष्याला जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे. हा जलद आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग असून कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख संगम आहे. गुरुकृपायोगानुसार साधना हा सांप्रदायिक साधनामार्ग नाही. नृत्य, गायन, संगीत याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करायची याचे मार्गदर्शन त्यांनी केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर आध्यात्मिक ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय विश्वविद्यालयाची स्थापना केली असून त्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे संत होऊनच बाहेर पडतील.