श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

महोत्सवस्थळी सोरटी सोमनाथाच्या प्राचीन शिवलिंगाची स्थापना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरीत स्थापन करण्यात आलेल्या सोरटी सोमनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतांना उजवीकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, शेजारी श्री. अरुण गुरुजी

फोंडा, १८ मे (वार्ता.) – ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी विविध संतांच्या पादुकांच्या अस्तित्वाने चैतन्याने भारलेली आहे. त्यातच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह अनेक संत-महंतांच्या उपस्थितीसह अनेक तीर्थक्षेत्रे, संत आणि मंदिरे यांचे अस्तित्व जागृत करणार्‍या दिव्य वस्तूही नगरीत आहेत. त्याचप्रमाणे सनातन राष्ट्राचा जागर करण्यासाठी येथे जमलेल्या सहस्रो हिंदु राष्ट्रवीरांना आशीर्वाद देण्यासाठी सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग, तसेच १४ संतांच्या चैतन्यमय पादुका आणि वस्तूही येथे आहेत. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रथम दिनी म्हणजे १७ मे या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सोरटी सोमनाथाच्या दिव्य शिवलिंगाची नगरीत स्थापना केली, तसेच सर्व संतांच्या चैतन्यमय पादुकांचे दर्शन घेतले.

महोत्सवस्थळी असलेल्या संतांच्या चैतन्यदायी पादुका आणि वस्तू !

१. प.पू. वेणास्वामी पादुका, मिरज, सांगली

२. प.पू. गोंदवलेकर महाराज आणि प.पू. ब्रह्मानंद महाराज यांच्या पादुका, सातारा

३. प.पू. सिद्धारूढ स्वामी यांच्या पादुका, हुबळ्ळी, कर्नाटक.

४. प.प. टेंब्येस्वामी यांच्या पादुका, माणगांव, महाराष्ट्र.

५. प.पू. गुळवणी महाराज यांच्या पादुका, पुणे, महाराष्ट्र.

६. प.पू. गगनगिरी महाराज यांचे साहित्य, रत्नागिरी, महाराष्ट्र.

७. समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका, सज्जनगड, महाराष्ट्र.

८. ताकपित्या विठोबा पात्र, सोलापूर, महाराष्ट्र.

९. चैतन्य कानिफनाथ यांच्या पादुका, मढी, अहिल्यानगर, महाराष्ट्र.

१०. प.पू. भीमस्वामी महाराज यांच्या पादुका, तंजावूर, तमिळनाडू.

११. प.पू. श्रीधरस्वामी यांच्या पादुका, वरदहळ्ळी, कर्नाटक.

१२. कल्याणस्वामी यांच्या पादुका आणि साहित्य, सातारा, महाराष्ट्र.

१३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका, इंदूर, मध्यप्रदेश.

१४. प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका, इंदूर, मध्यप्रदेश.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे प्रतिनिधी आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आंतरराष्ट्रीय संचालक श्री. दर्शक हाथी यांनी सोरटी सोमनाथाच्या शिवलिंगाची स्थापना पूजा केली, तर इरोड (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. अरुण गुरुजी यांनी मंत्रपठण केले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शिवलिंगरूपी सोरटी सोमनाथाची आरती केली. पादुकांचे दर्शन घेतांना त्या त्या पादुका घेऊन आलेल्या संबंधित देवस्थानांच्या महंतांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. महोत्सवाला आलेले मान्यवर, सर्वत्रचे साधक अन् सनातन राष्ट्रप्रेमी शिवलिंग आणि पादुका यांचे दर्शन घेत आहेत.