सर्वत्र झालेला बांगलादेशींचा सुळसुळाट धोकादायक !

खोपोली (जिल्हा रायगड) – येथून ३ बांगलादेशी महिलांना खोपोली पोलिसांनी कह्यात घेतले. सलिना सलीम शेख, नजमा सलमान फकीर, पॉपी सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी त्या स्वतः बांगलादेशी असल्याचे मान्य केले.
पोलिसांना त्यांच्याकडे कोणतेही पारपत्र वगैरे काहीही आढळले नाही. तिन्ही महिलांना आसरा देणार्या मिळ कातकरवाडी येथील मरुफा आजहर कुरेशी या बांगलादेशी महिलेलाही पोलिसांनी कह्यात घेतले.