
(एम्स (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान)
पणजी – गोव्यात एम्स रुग्णालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘देशातील अनेक राज्यांमध्ये एम्स रुणालये आहेत. गोव्यातही अशा रुग्णालयाची आवश्यकता आहे. मी लवकरात लवकर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन राज्यात एम्स रुग्णालय स्थापन करण्याविषयी पाठपुरावा करीन. गोव्यात वैद्यकीय पर्यटनला चालना देण्यासाठी, चांगल्या दर्जाची सेवा पुरवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.’’