(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.)
रत्नागिरी – ‘व्हिसा’चा कालावधी संपलेला असतांनाही शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधपणे वास्तव्य आणि बनावट कागदपत्रे असणार्या सलमा राहिल भोंबल या बांगलादेशी महिलेला येथील न्यायालयाने ६ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तिला १७ जानेवारी २०२५ या दिवशी येथील आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.
सलमा खातून बिलाल मुल्ला उपाख्य सलमा राहिल भोंबल ही १६ डिसेंबर २०१६ या दिवशी ९० दिवसांचा ‘व्हिसा’ घेऊन भारतात आली होती. या वेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी(ता. गुहागर) या ठिकाणी होते. यानंतर सलमा हिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला, तसेच ‘व्हिसा’ची मुदत संपली असतांनाही ती २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरित्या भारतात रहात आहे. या काळात तिने आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रेही बनवली आहेत. तिच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आता मुख्य न्यायदंडाधिकारी गोसावी यांनी सलमाला ६ महिने साधा कारावास आणि पाचशे रुपये दंड किंवा तो न भरल्यास १ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
संपादकीय भूमिकाबनावट कागदपत्रे बनवून देणार्यांनाही कठोर शिक्षा करा ! |