
शहापूर (जिल्हा ठाणे) – तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोसिम मुर्तुजा शेख (वय ३७ वर्षे) यांना ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उपसरपंचांनी घरपट्टी नावावर करून देण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडे घरपट्टी नावावर करून देण्यासाठी उपसरपंचांनी लाच मागितली होती. त्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाअशांना उपसरपंच पदावरून पदच्युत करायला हवे ! |