पिंपरी-चिंचवड (पुणे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांना १४ मे या दिवशी १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
‘श्री टेंड्रींग’ या आस्थापनांतून वायू गळती होऊन परिसरामध्ये दुर्गंधी पसरून प्रदूषण होत असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यासंबंधी पाटील यांनी २४ एप्रिल या दिवशी प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामा केला होता. पुढील कारवाई टाळण्यासाठी पाटील यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेले महापालिका प्रशासन ! |