आरोपीला अटक

चाकण (पुणे) – रात्रपाळीसाठी नोकरीवर जात असलेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १३ मे या दिवशी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रकाश भांगरे याला अटक केली. पीडित महिला नेहमी रात्री नोकरीवर जात असते. तिला बसथांब्यापर्यंत चालत जावे लागते. अंधाराचा अपलाभ घेत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. सदर महिला घटनास्थळावरून काही अंतरावर चालत गेली. तिथे महिला आणि पुरुष दिसले. त्यांना सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
पोलिसांनी आरोपीचा ठिकाणा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधून काढला. आरोपी मेदनकरवाडी येथे लपून बसला होता त्या ठिकाणाहून त्याला कह्यात घेण्यात आले.
संपादकीय भूमिकाअमानुषपणे बलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देणे आवश्यक ! असे केले तरच बलात्कारांच्या घटनांमध्ये घट येईल ! |