१०.३ कोटींचा ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त !

पुणे – ‘डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट’च्या (‘डी.आर्.आय.’च्या) पुणे, मुंबई शाखेतील अधिकार्यांना बँकॉकवरून पुणे विमानतळावर येणार्या विमानातील २ प्रवाशांकडे संशयित सामान आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार १२ मे या दिवशी बँकॉकहून पुणे येथे आलेल्या विमानातील प्रवाशांच्या सामानाचे सखोल अन्वेषण केले असता २ प्रवाशांच्या सामानात ११ हवाबंद पाऊच मिळाले. त्याचे अन्वेषण केल्यावर त्यामध्ये १०.३ कोटी रुपये किमतीचे बाजारमूल्य असलेले १०.३ किलो हायड्रोपोनिक गेंड हा उच्च नशा क्षमता असलेला गांज्यासारखा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ‘डी.आर्.आय.’ने २ प्रवासी, तसेच मुंबईतील १ वितरक अशा एकूण ३ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची तस्करी असो किंवा गांजा सापडणे असो हे प्रकार पुणे येथे वारंवार होणे म्हणजे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. याविषयी उपाययोजना काढणे आवश्यक ! |