पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हिंदुद्वेषाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे प्रत्युत्तर !

मुंबई – मी पाक लष्करप्रमुखांचे भाषण ऐकले. जर त्यांना वाटत असेल की, आम्ही वाईट आहोत, तर भारतियांना शिवीगाळ करा; पण हिंदूंना शिवीगाळ का करता ? , असे विधान ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केले. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देतांना ते बोलत होते. ते म्हणाले होते, ‘‘आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण प्रत्येक गोष्टीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म, चालीरीती, परंपरा, विचार, महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत.’’