डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियामध्ये आश्रय

कुआलालंपूर – भारतातून फरार असणारे डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियामध्ये आश्रय देण्यात आला आहे. डॉ. झाकीर यांना मलेशियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. तेथील मलय मुसलमानांमध्ये डॉ. झाकीर प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान नजीब रजाक यांनी मुसलमानांच्या मतांसाठी त्यांना आश्रय दिल्याचे म्हटले जात आहे. पुढील वर्षी येथे निवडणुका होणार आहेत.

मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहिद हामिदी म्हणाले की, डॉ. झाकीर यांनी देशातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे त्यांना अटक कशी करता येईल ? तसेच भारताकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलेली नाही. दुसरीकडे सरकारच्या या धोरणाच्या विरोधात मलेशियातील एका संघटनेने याचिका प्रविष्ट केली आहे. येथे सर्वधर्मीय रहात आहेत. डॉ. झाकीर धार्मिक शांततेला धोका आहेत. त्यामुळे त्यांना परत भारतात पाठवले जावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF