हरमल येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या २ रशियन नागरिकांना अटक

प्रतिकात्मक चित्र

पेडणे, १० मे (वार्ता.) – पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हरमल परिसरात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या २ रशियन नागरिकांना पेडणे पोलिसांनी कह्यात घेतले. पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी सलीम शेख आणि मांद्रे पोलीस ठाण्याचे निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. भारत-पाकिस्तान या देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून राज्यात भाडेकरू पडताळणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.