तपोभूमी, कुंडई येथील पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांना निमंत्रण देतांना श्री. वीरेंद्र मराठे श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई

कुंडई (गोवा) – गोव्यातील कुंडई येथील तपोभूमीवरील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांना ८ मे या दिवशी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक आणि म्हार्दाेळ येथील सनातनचे साधक श्री. परशुराम प्रभुदेसाई उपस्थित होते. श्री. वीरेंद्र मराठे यांनी सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांना १७ ते १९ मे या कालावधीत फर्मागुडी, फोंडा येथे होणार्‍या शंखनाद महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली आणि ‘स्वामीजींच्या भक्तगणांनी महोत्सवाला उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवावी’, अशी विनंती केली.