कांची कामकोटी पीठाधीश्वर स्वामी जयेंद्र सरस्वतीजी यांना सूक्ष्मातील लढ्याची माहिती देतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले. हिंदु धर्माची विविध माध्यमांतून होणारी हानी रोखणे आणि भारताला पुन्हा विश्वगुरुपदावर बसवणे, यांसाठी संत अन् त्यांचे अनुयायी यांचे संघटन करण्याच्या उद्देशाने संत बैठका, तसेच १० ठिकाणी सर्वसंपद्राय सत्संग आयोजित केले.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |