गुन्हा मागे घेण्यासाठी व्यक्तीचे अपहरण आणि खंडणीची मागणी 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई –  मीरा रोड येथील एका ३६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या पत्नीकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. वसईत त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. दहिसर पोलिसांनी रक्कम घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक केली. आरोपींनी त्यांच्याविरोधात नोंद केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी हे केल्याचे समजते.