‘मेट्रो-३’ मधील बीकेसी-आचार्य अत्रे मार्ग खुला !

बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण करतांना मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – कुलाबा वांदे सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामास वर्ष २०१७ मध्ये आरंभ झाला. कारशेडच्या अडचणीमुळे या प्रकल्पास विलंब झाला; परंतु सर्व अडचणींवर मात करून मेट्रो ३ मार्गिका अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गिकेतील आरे बीकेसी टप्पा १ ऑक्टोबर वर्ष २०२४ मध्ये चालू झाला, तर या मार्गिकेतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक हा टप्पा लवकरच चालू करण्यात येणार आहेत. ९ मे या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीत याचे लोकार्पण झाले.