Pune Pro-Pakistan Girl Rusticated : पुणे येथे मुसलमान तरुणीकडून सामाजिक माध्यमांत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण !

तरुणीला अटक

पुणे – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वेळी पुण्यात ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये शिकणार्‍या खादीजा शेख या तरुणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असे लिखाण सामाजिक माध्यमावर प्रसारित केले आहे. सकल हिंदु समाजाने याविषयी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर माहिती दिली आहे.

सकल हिंदु समाजाने या तरुणीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. तरुणीने सामाजिक माध्यमावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्यात आल्याचा दावा सकल हिंदु समाजाने केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली आहे. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने तिला महाविद्यालयातून काढून टाकल्याचे समजते.

संपादकीय भूमिका

अशा पाकप्रेमींवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून कारागृहात डांबा, तसेच शिक्षा भोगून संपल्यावर पाकिस्तानात पाठवा !