पनवेल – पळस्पे येथील ओशियन वाहनतळामध्ये एक संशयास्पद ट्रक आढळून आला. त्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक शिधा वाटप दुकानात वितरण होणारा (फोर्टीफाईड) तांदूळ असल्याचे उघड झाले. हा तांदूळ निर्यात करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी ट्रकची पडताळणी केली. अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, तसेच स्थानिक प्रशासन यांनी याची चौकशी चालू केली आहे.
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचाराची बजबजपुरी कधी संपणार ? गरिबांच्या तोंडचा घास पळवणार्यांपर्यंत पोचून त्यांना काय कठोर शिक्षा होते, ते जनतेला कळायला हवे ! |