सामूहिक बलात्कार प्रकरणी २ धर्मांधांना जन्मठेप !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – वर्ष २०१४ च्या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात वसीम खान आणि कादिर शेख या मुसलमानांसमवेत एका अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा दिली. (बलात्कार करणार्‍या अल्पवयीनांना अल्पवयीन म्हणायचे का ? हे आता कायद्याने ठरवण्याची वेळ आली आहे ! – संपादक) वरील दोन्ही मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणी निकाल देतांना न्यायालय म्हणाले की, एखाद्या महिलेचे किती जणांशी संबंध आहेत, यावर तिचे चरित्र कसे आहे, हे ठरवू शकत नाही. जर तिने संबंधांसाठी ‘नाही’ सांगितले तर याचा अर्थ ‘नाही’ असाच असतो. महिलेचे कितीही जणांशी संबंध असले, तरी सामूहिक बलात्कार हा सामूहिक बलात्कारच असतो. बलात्काराला एक आक्रमकतेशी संबंधित जोडलेला अपराध म्हणून पाहिले पाहिजे.

पीडित महिला घटस्फोट न घेता अन्य एका व्यक्तीसमवेत ‘लिव्ह इन’मध्ये (विवाहबाह्य संबंधात) रहात होती. वसीम खान आणि कादिर शेख यांनी तिला या व्यक्तीसमवेत रहाण्यासही विरोध केला होता. त्याला पीडितेने विरोध केल्यावर दोघांनी तिच्यावर आक्रमण केले. पीडितेला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.