पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रहित !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुणे विमानतळावरील १३ उड्डाणे रहित करण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इंडिगो, स्पाईसजेट यांची सेवा रहित केली आहे. या आस्थापनांकडून प्रवाशांची संपर्क करून त्यांच्या तिकिटाची पूर्ण रकमेची परतफेड किंवा अन्य पर्यायी उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संरक्षण विषयक आवश्यकतांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.