कार्तिक सिंह यांचा सकल हिंदु समाजाच्या वतीने गौरव
कोल्हापूर – उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंह यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे साडेतीनशे गड-दुर्ग पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ गडांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. ते कोल्हापूर येथे आले असता त्यांचा सकल हिंदु समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी कार्तिक सिंह म्हणाले, ‘‘मोहिमेला प्रारंभ करून ४ महिने पूर्ण झाले आहेत. उर्वरित गड-दुर्गांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड गडांचे दर्शन घेऊन आता मी पुढील प्रवासास निघालो आहे.’’