भारत-पाकिस्तान युद्धाचा मुंबई शेअर बाजारावर परिणाम !

सेन्सेक्स आणि निफ्टीतही घसरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – भारत-पाकिस्तान युद्धाचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ८० सहस्रच्या खाली उघडला, तर निफ्टी २४ सहस्रच्या खाली उघडला. प्रारंभीच्या व्यवहारात बीएस्ई सेन्सेक्स ६७२.८७ अंकांनी घसरून ७९,६६२.१४ वर पोचला, तर एन्एस्ई निफ्टी २५०.७५ अंकांनी घसरून २४,०४२.१५ वर पोचला आहे.

१. सेन्सेक्समधील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, इटरनल, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले यांचे शेअर्स तोट्यात आहेत, तर लार्सन अँड टुब्रो आणि टायटनचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढले.

२. बाजार उघडताच क्षेत्रीय निर्देशांक लाल नकारात्मक व्यवहार करत होते. या सर्वांमध्ये निफ्टी रिॲल्टीत लक्षणीय घसरण झाली. हा निर्देशांक १.५८ टक्कयाने घसरून १,४७३.६० च्या पातळीवर आला आहे. निर्देशांकातील सर्व शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. अनंत राज शेअर चार्टमध्ये आघाडीवर आहे.

३. भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरत असतांना निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकही दबावाखाली आहे. या निर्देशांकात त्याच्या मूल्याच्या आणखी १ टक्का घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप १०० साठी ही सलग दुसर्‍या सत्रातील घसरण आहे. ८ मे या दिवशी निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.९५ टक्क्याने घसरला.