ठाणे-बेलापूर मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी वाहतूक व्यवस्थेत पालट !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे येथील आयकिया समोरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू झाले आहे. या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये त्यासाठी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे. १६ मेपर्यंत हे काम चालू रहाणार आहे. या कालावधीमध्ये सर्व वाहनचालकांनी प्रवासाची गैरसोय आणि वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ठाण्याकडून येणार्‍या वाहनांनी अग्नीशामक सिग्नल महापे येथील पुलावरून सेक्टर २६, ए.पी.एम्.सी. पामबीच या पर्यायी मार्गाचा वापर करावा. ठाणेकडून येणार्‍या जड अवजड वाहनांनी अग्नीशामक सिग्नल महापे या ठिकाणाहून डावे वळण घेऊन, तसेच सविता केमिकल पुलाखालून डावे वळण घेऊन तुर्भे एम्.आय.डी.सी. मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.