उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. रुद्रांश हर्षल सावंत हा या पिढीतील एक आहे !
वैशाख शुक्ल त्रयोदशी (१०.५.२०२५) या दिवशी चि. रुद्रांश हर्षल सावंत याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. रुद्रांश हर्षल सावंत याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
१ अ. पू. (सौ.) अश्विनी पवार ओटी भरत असतांना ‘देवीच ओटी भरत आहे’, असे जाणवणे : ‘माझ्या गर्भारपणाच्या तिसर्या मासात पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३५ वर्षे) यांनी माझी ओटी भरली. त्यांनी ‘माझ्या चेहर्यावर तेज जाणवत आहे’, असे सांगितले. पू. अश्विनीताई ओटी भरत असतांना माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने आपोआपच भावाश्रू यायला लागले. ‘साक्षात् देवीच माझी ओटी भरत आहे’, असे मला जाणवत होते. पू. ताईंनीही त्या वेळी ‘माझ्यातील देवीतत्त्वाची ओटी भरत आहे’, असा भाव ठेवला होता.
१ आ. मला माझ्या झोपायच्या खोलीत, तसेच लादीवर सोनेरी रंगाचे दैवी कण दिसत असत.
१ इ. स्तोत्र म्हणतांना, तसेच सत्संगात गर्भातील बाळाची हालचाल अधिक जाणवणे : मी प्रतिदिन ‘श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र अन् गणपतिस्तोत्र म्हणत असे. मी भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि साधना प्रवचन ऐकत असे. मी ग्रंथवाचन करत असे. मी स्तोत्रे ऐकत असतांना, तसेच स्तोत्रे म्हणत असतांना मला गर्भातील बाळाची हालचाल जाणवत असे. मी प्रत्येक शनिवारी सत्संगाला जात असे. त्या वेळी मला गर्भातील बाळाची हालचाल अधिक जाणवत असे.
१ ई. एकदा ठाणे येथील सेवाकेंद्रात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. संगीता जाधव यांचे नामजपादी उपायांच्या संदर्भात शिबिर होते. तेव्हा सकाळपासून शिबिर संपेपर्यंत मला गर्भातील बाळाची हालचाल सतत जाणवत होती.’
– सौ. सान्वी हर्षल सावंत (चि. रुद्रांक्षची आई), नवीन पनवेल, जिल्हा रायगड.
१ उ. ‘बाळाच्या जन्माच्या आधी घरात पुष्कळ प्रकाश आणि चैतन्य जाणवत होते.’ – सौ. योगिता सावंत (चि. रुद्रांशची आजी, वडिलांची आई), नवीन पनवेल, जिल्हा रायगड.
२. जन्म
२ अ. सहनशील : ‘आम्ही ५ दिवस रुग्णालयात होतो. तेव्हा ‘बाळ पुष्कळ शांत आहे. अन्य बालकांप्रमाणे रडत नाही’, असे तेथील परिचारिका म्हणत होत्या. बाळाला ‘बीसीजी’ची लस दिली. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘बाळ पुष्कळ सहनशील आहे.’’
२ आ. ‘बाळाच्या छातीवर ‘ॐ’ उमटला आहे’, असे दिसले.’ (छायाचित्र आहे)
– सौ. सान्वी हर्षल सावंत
३. जन्म ते २ मास
अ. ‘बाळ रुग्णालयातून घरी येत असतांना मला घराच्या दाराजवळ शंखनाद ऐकू आला.’ – सौ. योगिता सावंत
आ. ‘रुद्रांश दीड मासांचा असल्यापासून हाताच्या बोटांची मुद्रा करून झोपतो. त्या वेळी त्याच्याकडे पाहून ‘तो नामजप करत आहे’, असे वाटते.
इ. तो कधीच रडत उठला नाही. माझे आई-बाबा म्हणायचे, ‘‘हा स्वतःही आनंदी असतो आणि त्याच्या हसण्याने तो इतरांनाही आनंद देतो.’’
– सौ. सान्वी हर्षल सावंत
ई. ‘रुद्रांश लहान असल्यापासून पुष्कळ वेळा सोनेरी आणि चंदेरी या रंगांचे दैवी कण त्याच्या शरिरावर दिसत असत.
उ. त्याची दृष्ट काढतांनाही तो हसत असे.’
– सौ. अश्विनी परब (चि. रुद्रांशची आजी, आईची आई), देवगड
४. वय २ मास ते ६ मास
अ. ‘मी दिवसभर विविध प्रसंगी श्लोक म्हणत असे आणि प्रार्थना करत असे. त्या वेळी तो आनंदाने टाळ्या वाजवत असे.
आ. त्याच्या पलंगावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील एक ग्रंथ ठेवला आहे. रुद्रांश त्याकडे बघून तो हसतो.
इ. रुद्रांश ६ मासांचा असतांना आम्ही त्याला घेऊन तिरुपती बालाजी येथे गेलो होतो. तो प्रवासात पुष्कळ शांत आणि आनंदी होता.
ई. आम्ही देवगड येथे आईकडे असतांना घरी सद्गुरु सत्यवान कदम आले होते. त्या वेळी रुद्रांश सद्गुरु सत्यवानदादांकडे सहजतेने गेला. तो त्यांच्याकडे पाहून हसला. तेव्हा सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘तो हसत आहे आणि त्यालाही कळले आहे की, तो कोणाकडे आला आहे.’
– सौ. सान्वी हर्षल सावंत
५. वय ६ मास ते १ वर्ष
अ. ‘रुद्रांश सकाळी उठल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथाचे दर्शन घेतो आणि टाळ्या वाजवतो.
आ. त्याला कडेवर घेऊन ‘जय गुरुदेव’ असे म्हटल्यावर, तसेच श्रीकृष्णाचा जयघोष केल्यावर तो हात वर करतो आणि हसतो.
इ. तो सनातन पंचांगातील देवतांच्या चित्राकडे आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून हसतो.
ई. आमच्या घरी सत्संग असतांना तो झोपतो किंवा शांतपणे खेळतो. तो सगळ्या साधकांकडे आवडीने जातो.
५ उ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ‘बाळ दैवी आहे’, असे सांगणे : एकदा पू. (सौ.) अश्विनी पवार घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी ‘हे बाळ दैवी आहे’, असे सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हा मला वाटले, ‘बाळाच्या जन्माच्या आधी आणि जन्म झाल्यावर बाळाला सद्गुरु आणि संत यांचे चैतन्य मिळाले. हा जीव किती भाग्यशाली आहे ! ’
– सौ. योगिता सावंत
ऊ. ‘मी देवपूजा करत असतांना तो देवघरापाशी येतो. तो देवघराकडे बघून हसतो.’ – श्री. श्रीधर सावंत (चि. रुद्रांशचे आजोबा, चि. रुद्रांशच्या वडिलांचे वडील)
ए. ‘त्याला भजन म्हणायची आवड आहे’, हे त्याच्या कृतींतून दिसून येते.
ऐ. ‘त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे’, असे मला जाणवते.
ओ. तो कधीच त्रास देत नाही.’
– श्री. हर्षल श्रीधर सावंत (चि. रुद्रांशचे वडील), नवीन पनवेल, जिल्हा रायगड.
औ. ‘श्रीकृष्णजयंती निमित्त आम्ही घरात श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा केली आणि रुद्रांशला पाया पडायला नेले. रुद्रांश ती पूजा पुष्कळ भावपूर्ण बघत होता आणि कृष्णाकडे पाहून हसत होता.’ – सौ. अश्विनी परब
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, भगवान श्रीकृष्ण, तुमच्या कृपेने रुद्रांश सारखे गुणी बालक आम्हाला लाभले’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.४.२०२५)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |