
उरुळी कांचन (पुणे) – ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रस्त्यावरील श्री गणपति मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरांनी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना ९ मे या दिवशी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. सकाळी भाविक दर्शनासाठी मंदिरामध्ये गेल्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आश्रम रस्त्यावरील श्री गणपति मंदिराचे मागील काही दिवसांपासून बांधकाम चालू आहे. त्यामुळे मंदिरातील विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे मंदिरातील सी.सी.टी.व्ही. बंद होते. याचा अपलाभ घेत चोरांनी मंदिराची दानपेटी फोडली. भक्तांनी दान केलेले अनुमाने १० ते १२ सहस्र रुपये चोरीस गेल्याची माहिती ‘महात्मा गांधी तरुण मंडळा’तील कार्यकर्त्यांनी दिली.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद ! |