मुळशी (जिल्हा पुणे), ९ मे (वार्ता.) – श्री सद्गुरु सेवा संस्थेने १ मे ते ७ मे या कालावधीत नाणेगाव, कुळे, मुळशी येथे निवासी ‘श्री सद्गुरु संस्कार शिबिर’ आयोजित केले होते. तेथील आयोजक रोहित सुर्वे महाराज यांनी शिबिरातील उपस्थित मुले आणि त्यांचे पालक यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. त्या अंतर्गत ६ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. क्रांती पेटकर यांनी ‘लव्ह जिहादची समस्या आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी श्री सद्गुरु सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश शेडगे यांच्यासह १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या व्याख्यानाला उपस्थित सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनीही संबोधित केले. या वेळी १२० हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला.
या वेळी ‘लव्ह जिहाद’ हे ग्रंथ काहींनी विकत घेतले, तसेच इतरांनीही या ग्रंथाची मागणी दिली आहे. ‘पुढच्या शिबिराच्या वेळी आपण ८ दिवसांच्या व्याख्यानाचे नियोजन करूया’, असे आयोजकांनी सांगितले, तसेच नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी पण प्रयत्न करूया, असेही आयोजकांनी सांगितले.