सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !
नवी देहली – जर भारतात उपस्थित असलेले रोहिंग्या निर्वासित भारतीय कायद्यानुसार परदेशी असल्याचे आढळले, तर त्यांना हद्दपार केले पाहिजे, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला. ‘देशात प्रवेश केलेल्या निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या संबंधित उच्चायुक्तांनी जारी केलेले ओळखपत्र कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे. देशातील रोहिंग्यांच्या रहाणीमानाशी संबंधित आणि त्यांना हद्दपार करण्याची मागणी करणार्या याचिकांवर सुनावणी चालू असतांना न्यायालयाने असा आदेश दिला.