शोधून शोधून मारू ! – एकनाथ शिंदे
मुंबई – ‘हा नवा भारत आहे, धुंड धुंड के मारेंगे । पिक्चर अभी बाकी है । (शोधून शोधून मारू. चित्रपट अजून बाकी आहे.)’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान आणि सैन्य यांचे कौतुक केले.
धर्मांध महिलेकडून व्यावसायिकाचा खून
मुंबई – जयपूरहून आलेल्या ४४ वर्षीय बरकत राठोड हिने मालाड येथील हॉटेलमध्ये अनैतिक संबंध असणार्या इमाम मनसुरी या व्यावसायिकाची हत्या केली. शवविच्छेदनात त्याला विष दिल्याचे आढळून आले. त्याच्या भ्रमणभाषवरून जीव देत असल्याचा संदेश पाठवून तो आत्महत्या करत असल्याचे भासवले. पळण्याच्या सिद्धतेत असलेल्या बरकतला पोलिसांनी तिला सुरत स्थानकावर अटक करून गुन्हा नोंद केला.
डोंबिवलीत बारवर धाड !
डोंबिवली – पूर्वेकडील एका बारमध्ये महिला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बारवर धाड टाकून १४ महिला गायिका, ११ ग्राहक, बार मालक, कॅशियर आणि वाद्यवृंद वादक अशा ३० जणांना अटक केली.
नवी मुंबईत वाहनांची कसून पडताळणी !
नवी मुंबई – पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर नवी मुंबईत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ चालू करण्यात आले आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची कागदपत्रे पडताळली जात आहेत. विविध ठिकाणी नाकेबंदीकरून वाहनांची कसून पडताळणी चालू करण्यात आली आहेत.
रेल्वेच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू !
पेण – येथील चिंचपाडा भागात रहाणारे पोलीस कर्मचारी रूपेश भोनकर (वय ५० वर्षे) यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. ही रेल्वेगाडी मुंबईहून मेंगलोरकडे जात असतांना पेण हद्दीतील अंतोरे रेल्वे पुलाजवळ भोनकर यांना रेल्वेची जोरात धडक बसली.
मुंबई पोलीस सतर्क !
मुंबई- पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर प्रतिआक्रमणाची शक्यता गृहित धरून मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. यापूर्वी मुंबईत अनेक आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या इमारती, सरकारी निवासस्थाने, प्रार्थनास्थळे, पर्यटनस्थळे या ठिकाणची सुरक्षा अधिक चोख करण्यात आली आहे. विविध यंत्रणांकडून येणार्या चेतावण्या आणि सूचना गांभीर्याने घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
सीमेसह अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क ठेवले आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत किंवा त्यावर विश्वास ठेवू नये, संशयास्पद वस्तू अगर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.