मुख्यमंत्र्यांची आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक

पणजी, ८ मे (वार्ता.) – कृती दल समितीने कला अकादमीच्या दुरुस्तीकामाविषयीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ८ मे या दिवशी सादर केला आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या अहवालावर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसमवेत ९ मे या दिवशी एका बैठकीचे आयोजन केले आहे. कृती दल समितीचे अध्यक्ष विजय केंकरे म्हणाले, ‘‘कला अकादमी या राज्यातील प्रतिष्ठित सांस्कृतिक संकुलाच्या नूतनीकरण कामामध्ये १८ ते २० त्रुटी आढळल्या आहेत. मुख्यमंत्री कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी नव्याने निविदा काढण्याची शक्यता आहे.’’