|

वास्को, ८ मे (वार्ता.) – बिर्लाहून संभाजीनगर (वास्को) येथे जाणारी एक खासगी प्रवासी बस ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वेर्णा महामार्गावर क्विनीनगर येथे उलटली. यामध्ये वाहक शिवा मदार हा ठार झाला, तर २८ प्रवासी घायाळ झाले. १०८ आपत्कालीन सेवा प्रणालीकडून ही माहिती मिळाली आहे. ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती आणि ती वेगाने जात होती. (अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग कोणती उपाययोजना करणार आहे ? – संपादक) एका वळणावर बस उलटली. या अपघातात अनेक प्रवासी घायाळ झाले आहेत. यामधील गंभीररित्या घायाळ झालेल्यांना चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाचालवणार्या खासगी बसचालकांवर हत्येचा गुन्हा नोंद का करू नये ? |