अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या २ बांगलादेशींना जुन्नर (पुणे) येथे अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

ओतूर (जिल्हा पुणे) – येथे मागील १५ वर्षांपासून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ताजमीर अन्सारी, महंमद गुलाम यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड वाहन परवाना आणि भ्रमणभाष संच, तसेच कालबाह्य झालेले बांगलादेशी पारपत्र आणि ‘व्हिसा’ जप्त केले आहेत. आतंकवादविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना कसा मिळाला, हेही शोधणे आवश्यक ! त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा करायला हवी ! – संपादक)