‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची सेवा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांकडून करून घेणार असल्याविषयी साधकाला आलेली अनुभूती !

 

‘४.४.२०२५ या दिवशी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘फर्मागुडी (फोंडा, गोवा) येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ‘या महोत्सवाला देशभरातून सुमारे २५ सहस्र साधक, जिज्ञासू आणि हितचिंतक उपस्थित रहातील’, असा अंदाज आहे. या महोत्सवात सनातनच्या साधकांना पुष्कळ सेवा असेल. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित होईल का ? हा एवढा मोठा कार्यक्रम सुरळीत पार पडेल ना ? या महोत्सवाच्या सेवेत मी प्रपंचात राहूनही कशा प्रकारे अधिकाधिक सहभाग घेऊ शकतो ?’

श्री. यतिन गावणेकर

मनात अशा विचारांचे काहूर माजलेले असतांनाच मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत गेलो. तेव्हा मला झोप लागली. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, ‘तू काही काळजी करू नकोस. सर्वकाही ठीक होईल. सेवा झाल्यानंतर तू कृतज्ञता व्यक्त करतोस ना ?’ यानंतर मी झोपेतून जागा झालो. त्या वेळी मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते. ‘गुरुदेव मला भेटून गेले. ते माझ्या समवेतही असतात’, असे विचार माझ्या मनात येऊन माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. यतिन गावणेकर, फोंडा, गोवा. (४.४.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक