पंतप्रधान मोदी यांना ‘मारेकरी’ संबोधले !
रत्नागिरी – भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरून समाजमाध्यमांत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मारेकरी (किलर) आहेत’, असे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या सामाजिक माध्यमांवर ‘स्टेटस’ ठेवणार्या महंमद बद्रुद्दीन परकार (वय २१ वर्षे) या धर्मांधाला देशप्रेमी नागरिकांनी चोप दिला. उपचारांसाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ७ मे या दिवशी ही घटना घडली. तो ज्या आस्थापनेत कामाला होता, तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे.
परकार याने वरील संतापजनक स्टेटस ठेवल्याचे कळताच देशप्रेमी नागरिकांनी तो ज्या आस्थापनेत काम करत होता, ते आस्थापन गाठले. तथापि त्याला असे स्टेटस ठेवल्यावरून त्याच दिवशी काढून टाकल्याचे आस्थापनाने सांगितले. यानंतर देशप्रेमी नागरिकांनी त्याला शोधून काढून यथेच्छ चोप दिला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दंगल पथकाला पाचारण केले.
संपादकीय भूमिकासरकारने अशांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे ! |