धर्मांधाला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी
ठाणे – सायबर पोलिसांनी भ्रमणभाषची ‘सी.डी.आर्.’ (संभाषणाची माहिती) माहितीसह इतर संवेदनशील माहिती सराईत गुन्हेगाराला विकली. हे प्रकरण उघड झाल्यावर दोघा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. ठाणे शहर सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे (वय ३६ वर्षे) आणि पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब (वय ३१ वर्षे) यांनी पदाचा गैरवापर करत अनुमतीविना भ्रमणभाषचे ‘सी.डी.आर्.’, ‘एस्.डी.आर्.’, लोकेशन काढून सराईत गुन्हेगाराला विकले. या प्रकरणी पोलिसांना महंमद सोहेल राजपूत (वय २८ वर्षे) याला अटक केली आहे.
दोन पोलिसांसह सराईत गुन्हेगारालाही ठाणे न्यायालयात उपस्थित करण्यात आले असून त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांनी गुन्हेगाराशी हातमिळवणी करणे, म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! |