Hindustan Petroleum’s Server Down : हिंदुस्थान पेट्रोलियमचा सर्व्हर डाऊन; पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा ठप्प !

पानेवाडी (मनमाड) येथील घटना

मनमाड (नाशिक) – मनमाडमधील पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम आस्थापनाच्या प्रकल्पाद्वारे राज्यभरातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करण्यात येतो; मात्र येथील सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व कामकाज थांबले आहे. परिणामी राज्यातील इतर पेट्रोल पंपावर केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल भरून नेणार्‍या ट्रँकरच्या पुष्कळ रांगा लागलेल्या आहेत. पानेवाडीच्या प्रकल्पातून प्रतिदिन ३५० टँकरच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा केला जातो; पण इंधनाअभावी मात्र अनेक टँकर आस्थापनाच्या आवारात उभे आहेत. आस्थापनाकडून सर्व्हर चालू करण्याचे काम युद्धपातळणीवर चालू आहे.