Uttarakhand Helicopter Crash : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे हेलिकॉप्टर कोसळून ५ जण ठार

घटनास्थळ

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील उत्तरकाशी येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ५ प्रवासी ठार, तर २ जण गंभीर घायाळ झाले. उत्तरकाशीतील गंगनी येथील भागीरथी नदीजवळ हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर गंगोत्री धामला जात होते. प्रशासनाने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये ४ पुरुष आणि २ महिला होत्या. कॅप्टन रॉबिन सिंह हे त्याचे पायलट होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे ‘एअरोट्रान्स सर्व्हिस’ या खासगी आस्थापनाचे होते. यातील प्रवासी हे महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश येथील होते.

काही दिवसांपासून उत्तराखंडचे हवामान खराब आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पाऊस यांची चेतावणी दिली आहे. चारधाम यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीटही झाली आहे.