हत्तींच्या कळपाचा झोळंबे गावात प्रवेश

दोडामार्ग – तळकट भागात स्थिरावलेले हत्ती ७ मेच्या पहाटे झोळंबे गावात आले आहेत. झोळंबेतील राऊळवाडी, भिडेवाडी भागांत हत्तींनी माड बागायतीची हानी केली. दिवसा हत्ती इंदळवाद, शिदावर जंगलात असल्याची माहिती वन अधिकार्‍यांनी दिली देण्यात आली. या कळपात एकूण ५ हत्ती आहेत. या परिस्थितीमुळे झोळंबे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोर्ले गावात एका शेतकर्‍याला हत्तीने जीवे मारल्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवण्याबाबत ग्रामस्थांमध्ये निर्णय झाला होता. ‘शासनाने तातडीने हत्ती पकड मोहीम राबवावी’, अशी स्थानिकांची मागणी आहे; मात्र वन विभाग कारवाई करत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

झोळंबे गावातील स्थानिकांनी हत्तींच्या कळपाला जंगलात हुसकावून लावले. सध्या काजू हंगाम शेवटच्या टप्प्यात असतांना गावात हत्तींनी प्रवेश केल्याने ग्रामस्थांना काजू बागायतीत कामासाठी जाता आले नाही.