सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील कार्याची साक्षीदार असलेली त्यांची चैतन्यमय खोली !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करतात. या खोलीने गुरुदेवांमधील दिव्य चैतन्य अनुभवले आहे. गुरुदेवांवर मोठ्या वाईट शक्तींनी सूक्ष्मातून केलेली जीवघेणी आक्रमणेही तिने अनुभवली आहेत. गुरुदेवांची खोली, भिंती, लादी इत्यादींची विविध प्रसंगी, उदा. त्रासदायक किंवा चांगले पालट होणे, वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटना घडणे इत्यादी वेळी छायाचित्रे काढण्यात आली आहेत. यांतील काही निवडक छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या लेखातून आपण गुरुदेवांच्या खोलीने अनुभवलेला देवासुर लढा, तसेच गुरुदेवांच्या खोलीत झालेले त्रासदायक आणि चांगले पालट इत्यादींच्या संदर्भातील संशोधन पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
रामनाथी आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वास्तव्य असलेली १३x१८ चौरस फूट आकाराची खोली

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीने अनुभवलेला देवासुर लढा

सौ. मधुरा कर्वे

गुरुदेवांच्या खोलीत वर्ष २०१३ ते २०२१ या कालावधीत विविध प्रकारचे त्रासदायक आणि चांगले पालट अनुभवास आले. विशेष म्हणजे सूक्ष्मातील वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांचे पडसाद गुरुदेवांच्या खोलीत स्थुलातूनही स्पष्टपणे दिसून येतात, उदा. खोलीतील भिंती आणि लादी यांवर आपोआप डाग पडणे, भिंतीला पापुद्रे सुटणे, भिंतीवर वाईट शक्तींचे चेहरे अन् आकृत्या उमटणे, लादीवर तेलकट डाग पडणे, लादीवर पायांचे पंजे उमटणे इत्यादी. या देवासुर लढ्यात ईश्वर विविध माध्यमांतून गुरुदेवांचे रक्षण करत आहे. गुरुदेवांमधील वाढत्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या खोलीवर दिसून येत आहे. गुरुदेवांनी त्यांच्यातील संशोधकवृत्तीमुळे वेळोवेळी त्रासदायक आणि चांगल्या पालटांची छायाचित्रे संशोधनासाठी काढून ठेवण्याविषयी साधकांना मार्गदर्शन केले. या छायाचित्रांतील काही निवडक छायाचित्रांच्या लोलकाने केलेल्या चाचण्यांतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील त्रासदायक पालटांच्या छायाचित्रांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : या छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

टीप १ – या छायाचित्रातील पांढर्‍या डागाला स्वतःचा प्रकाश आहे. त्यामुळे खोलीतील प्रकाश कमी केला, तरी तो डाग अधिक स्पष्ट आणि प्रकाशमान दिसतो.

टीप २ – या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे यातील वाईट शक्तींचे डोळे आणि चेहरा हलतांना जाणवतात.

१ अ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील त्रासदायक पालटांच्या छायाचित्रांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : मोठया वाईट शक्ती सूक्ष्मातून गुरुदेवांवर त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करून त्यांच्या दैवी कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गुरुदेवांच्या समष्टी कार्याला (म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या महान समष्टी कार्याला) खिळ बसावी, म्हणून वाईट शक्ती नवनवीन क्लृप्त्या लढवून त्यांच्याशी सूक्ष्म युद्ध करतात; पण गुरुदेवांमधील चैतन्यापुढे त्या हतबल होतात. गुरुदेवांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे वाईट शक्तींना त्यांचे ध्येय (मोठ्या वाईट शक्तींचे ध्येय ‘पृथ्वीवर आसुरी राज्य निर्माण करणे’, हे आहे.) साध्य करता येत नाही. त्यामुळे त्या त्वेषाने गुरुदेवांमधील चैतन्याशी लढत असतात. गुरुदेवांची खोली म्हणजे जणू या सूक्ष्मातील युद्धाची रणभूमीच बनली आहे.

खोलीतील त्रासदायक पालटांची छायाचित्रे

खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या वाईट शक्तींच्या आकृत्या

खोलीतील एका लादीवर उमटलेले २ फूट लांबीचे पायाचे २ पंजे

खोलीतील चांगल्या पालटाचे छायाचित्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीवर पाणी ओतले असता, त्या पाण्यात दिसणारे प्रतिबिंब ! ‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’, या वचनाची प्रचीती वरील छायाचित्र पहातांना येते !

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील चांगल्या पालटांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : या छायाचित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काही नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

टीप ३ – या छायाचित्रातील आरशात खोलीतील देवघराचे प्रतिबिंब दिसत आहे.

१ आ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील चांगल्या पालटांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : एकीकडे सूक्ष्मातील युद्धामुळे गुरुदेवांच्या खोलीत त्रासदायक पालट अनुभवास येतात, तर दुसरीकडे गुरुदेवांमधील वाढत्या चैतन्यामुळे, तसेच वेळोवेळी ईश्वर गुरुदेवांना करत असलेल्या साहाय्यामुळे खोलीत आप, तेज आणि वायू या तत्त्वांचे चांगले पालटही दिसून येत आहेत, उदा. लादीवर प्रतिबिंब दिसणे (आपतत्त्व), खोली अधिक प्रकाशमान होणे (तेजतत्त्व), भिंती गुळगुळीत होणे (वायुतत्त्व) इत्यादी. गुरुदेवांमधील वाढत्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम ते रहात असलेल्या खोलीवर होत आहे. त्यामुळे खोलीत पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे. गुरुदेवांच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे या खोलीतील चैतन्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

खोलीतील भिंत नेहमीच्या तुलनेत अधिक गुळगुळीत झाल्याने तिच्यासमोर ठेवलेल्या विविध रंगीत कापडांची पुसट प्रतिबिंबे भिंतीवर दिसत आहेत.

गुरुदेवांची खोली पुष्कळ भाग्यवान आहे; कारण ती गुरुदेवांच्या सूक्ष्मातील कार्याची प्रत्यक्ष साक्षीदार बनली आहे. एवढेच नव्हे, तर देवासुर लढ्यातही तिचे मोलाचे योगदान आहे. गुरुदेवांची चैतन्यमय खोली भावी पिढ्यांसाठी जणू चैतन्याचा स्रोत बनली आहे. गुरुदेवांच्या अस्तित्वाने परमपावन झालेल्या या चैतन्यमय खोलीप्रती आणि गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.३.२०२५)


तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

संपर्क : सौ. मधुरा कर्वे

ई-मेल : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.