सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !
मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. २५ सहस्रांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील ९ आतंकवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक ‘एअर स्ट्राइक’ करून ते उद्ध्वस्त केले. सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक सैन्य कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. संपूर्ण हिंदु समाज हा भारतीय सैन्यासमवेत एकजुटीने उभा आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. सनानत संस्थेच्या वतीने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील ‘श्री जीवदानी देवी संस्थान’चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर हे उपस्थित होते.

श्री. वर्तक पुढे म्हणाले की,
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदु संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणार्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल.
🇮🇳 Sanatan Sanstha welcomes the Indian Armed Forces' decisive strike on 9 terror camps in Pakistan.
🗣️ “This is not just a military operation—it is a Shankhnaad of national identity, self-respect & awakened Hindu resolve. The killing of 26 innocent Hindu pilgrims in Pahalgam was… pic.twitter.com/00KjoMIhKg
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 7, 2025
अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !अंनिसचा कार्यकर्ता वेगळे नाव वापरून रायगड जिल्ह्यात रहात होता. यापूर्वीही अंनिसच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे वेगवेगळ्या प्रकरणातून लक्षात आले. यांच्या संस्थेचे अनेक घोटाळे आहेत.
त्यामुळे यांच्या संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी आम्ही करत आहोत, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या वेळी केली. |
अधिवक्ता घनश्याम उपाध्याय या वेळी म्हणाले, ‘‘सनातन शंखनाद महोत्सव अशा वेळी होत आहे की, राष्ट्र एका मोठ्या संकटातून जात आहे. गोवा येथे होणार्या सनातन राष्ट्र महोत्सवात सनातन राष्ट्राची उद्घोषणा होणार असून या महोत्सवात संत आणि सर्व चर्चा करून सनातन राष्ट्र स्थापित करण्याचा निर्धार करणार.’’
श्री. प्रदीप तेंडोलकर या वेळी म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने मंदिर विश्वस्त उपस्थित रहाणार आहेत. सध्या जगभरात अशांतीचे वातावरण आहे. त्यामुळे या अभूतपूर्व कार्यक्रमात विश्वशांतीसाठी हवन केले जाणार आहे.’’
मुंबईतून सहभागी होणारे मान्यवरमहाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भारताचार्य सु.ग. शेवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, मेढे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, जैनमुनी विनम्रसागरजी महाराज, राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर, प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी, मुंबादेवी देवस्थानचे प्रबंधक श्री. हेमंत जाधव, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार |
या महोत्सवाला श्री श्री रविशंकरजी, प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी, काही राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आमदार आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
‘सनातन राष्ट्रा’साठी एक कोटीचा रामनाम जपयज्ञ आणि संतसभा, ‘हिंदु राष्ट्ररत्न’, ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार वितरण, लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, संतांच्या पादुकांचे दर्शन आणि महाधन्वंतरी यज्ञ आदी कार्यक्रम या अंतर्गत होतील. या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.sanatanrashtrashankhnad.in/ संकेतस्थळाला भेट द्या ! |