नागपूर येथे सोन्याची बिस्किटे चोरणारी टोळी अटकेत

नागपूर – येथील सूर्यवंशी रिफायनरीमधून सोन्याची बिस्किटे चोरणार्‍या टोळीतील २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मालगावे आणि जगन्नाथ जावीर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून ५५ ग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीतील २ जण अद्याप पसार आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या टोळीने देहली येथे अशाच प्रकारची चोरी केल्याचे उघड झाले आहे. कोलकाता येथेही त्यांनी चोरी केल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.