उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मोक्षा विजयेंद्र कुड्वा ही या पिढीतील एक आहे !
(वर्ष २०२५ मध्ये कु. मोक्षा विजयेंद्र कुड्वा हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे. – संकलक)
‘वैशाख शुक्ल एकादशी (८.५.२०२५) या दिवशी कु. मोक्षा विजयेंद्र कुड्वा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मोक्षा विजयेंद्र कुड्वा हिला तिच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. परिस्थिती स्वीकारणे आणि स्थिर रहाणे
‘वर्ष २०२० मध्ये कोरोनाच्या कालावधीत आमचे मंगळुरू येथे येण्याचे ठरल्यावर मोक्षाला पुष्कळ आनंद झाला. ती सर्व परिस्थितीत सकारात्मक रहात होती. ‘मंगळुरू येथे रहायला गेल्यास सेवाकेंद्र घरापासून पुष्कळ जवळ आहे. त्यामुळे मला (आईला) सेवा करता येईल’, असा तिचा भाव होता. मला सेवा करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यानंतर तिच्यात स्थिरता येऊन तिचा नामजप आणखी उत्तम रितीने होऊ लागला.
२. धर्माचरणाची आवड
वर्ष २०२२ मध्ये मोक्षाच्या बाराव्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आत्याने केक आणला; पण मोक्षाला अन्नब्रह्मावर सुरी चालवून केक कापणे आवडले नाही; म्हणून ती पुष्कळ रडू लागली. ‘तू तसे केले नाहीस, तर तुझ्या वडिलांना राग येईल’, असे तिला सांगितल्यावर तिने चमच्याने केक काढून सर्वांना वाटला. ती मला म्हणाली,‘‘यापुढे केक आणू नकोस’, हे तू आत्याला सांग.’’ ती हे सांगत असतांना तिच्यात साधनेचे गांभीर्य आणि तळमळ असल्याची मला जाणीव झाली.

३. घरातील कामे आश्रमसेवा म्हणून करणे
ती मला प्रत्येक सेवेत सहकार्य करते. मला प्रतिदिन संध्याकाळी सत्संग असतो. मोक्षाचे वडील संध्याकाळी ७ वाजता घरी आले की, मोक्षा त्यांच्यासाठी खाऊ बनवते आणि त्यांना चहा करून देते. ती ७ वर्र्षांची असल्यापासून घरातील केर काढते आणि लादी पुसते. ती मला सांगते, ‘‘घरातील केर काढणे आणि लादी पुसणे’, हे मी आश्रमसेवा म्हणून करते.’’
४. ‘सेवा आणि साधना’ यांची तळमळ
ती ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यांचा घरोघरी जाऊन मनापासून प्रचार करते. ती दिलेली सेवा श्रद्धेने पूर्ण करते.
तिला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी होऊन पूर्णवेळ साधना करायची आहे.
५. शिकण्याची वृत्ती
आम्ही तिला सांगितलेल्या गोष्टी ती तत्परतेने समजून घेण्याचा प्रयत्न करते. तिच्यात शिकण्याची वृत्ती अधिक आहे. तिच्यात साधकत्व आहे.
६. आसक्ती नसणे
आम्ही माझ्यासाठी साडी खरेदी करायला गेल्यावर मोक्षाला ‘तुला पोशाख घ्यायची इच्छा होत नाही का ?’, असे विचारतो. तेव्हा ती मला सांगते, ‘‘तू हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आणि प्रवचन करणे या सेवांनिमित्त साड्या खरेदी करतेस. माझ्याकडे पोशाख आहेत.’’ तेव्हा ‘मी साधनेत मागे आहे’, असे मला वाटले. मोक्षाची ‘हे हवे, ते हवे’, अशी वृत्ती नाही.
७. गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव गोवा येथे झाला. तेव्हा मोक्षाला गोव्याला जाण्याची संधी मिळताच ती म्हणाली, ‘‘हा माझा परमभाग्याचा दिवस आहे.’’ तिथे गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ती म्हणाली, ‘‘माझ्या जन्माचे सार्थक झाले. साक्षात् महाविष्णुरूपी गुरुदेवांचे दर्शन झाले.’’ ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी गोव्याला जाऊन गुरुदेवांना पहाण्याची तिची पुष्कळ इच्छा होती. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर आता ती गोव्याला जाण्याविषयी विचारत नाही.’
– सौ. पवित्रा कुड्वा (कु. मोक्षाची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (२६.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.