भंडारा येथील अल्पवयीन मुलीसमवेत विवाह केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

भंडारा – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या एका गावात १७ वर्षे १० मास अल्पवयीन मुलीचा एका आंतरराज्यीय मुलासमवेत विवाह लावून दिला; मात्र याची माहिती ‘चाइल्ड हेल्पलाईन’ला (अल्पवयीन गटातील मुलांना साहाय्य करणारे केंद्र) मिळाली. जिल्हा आणि महिला बालविकास विभाग भंडारा अन् चाइल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त पथकाने अल्पवयीन मुलीच्या गावाला भेट देऊन निश्चिती केली. ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.