मुंबईत पाऊस !

मुंबई – शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. या अवकाळी पावसाचा नेहमीप्रमाणे लोकल सेवेवर परिणाम झाला. जोरदार वार्‍यामुळे ओव्हरहेड वायर्समध्ये समस्या आली. मध्य रेल्वे विस्कळीत झाली. ठाणे स्थानकातून वाशी आणि पनवेलला जाणार्‍या गाड्या विलंबाने धावत होत्या. वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि दहिसर परिसरात पाऊस आला. अंबरनाथ, ठाणे आणि कल्याण मध्येही जोरदार पाऊस आला, तसेच वीज गेली. चुनाभट्टीमध्येही पावसाची रिपरिप होती.