सी.डी.आर्. विक्रीचे प्रकरण

ठाणे, ७ मे (वार्ता.) – ठाणे पोलीस दलातील २ पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून भ्रमणभाषसंचाच्या विशिष्ट संभाषणाचा (कॉल) तपशील (सी.डी.आर्.) चोरून तो एका धर्मांधाला विकल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी येथील सायबर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.