न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना देण्यात येणारा १९ सहस्र कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. ट्रम्प यांनी निधी न दिल्यामुळे संयुक्त राष्ट्रे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत.
१. अर्थसंकल्पीय संकटामुळे संयुक्त राष्ट्रे त्यांच्या अनेक विभागांमधून ३ सहस्र कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.
२. वर्ष २०२५ साठी संयुक्त राष्ट्रांचा एकूण अर्थसंकल्प ३२ सहस्र कोटी रुपयांचा आहे. अर्थसंकल्पीय संकटावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आधीच त्यांचा अर्थसंकल्प १७ टक्क्यांनी अल्प करण्याची योजना आखली आहे.
३. संयुक्त राष्ट्रांच्या अर्थसंकल्पात चीनचा वाटा २० टक्के आहे.
४. संयुक्त राष्ट्रांना मिळणारा पैसा सदस्य देशांच्या आर्थिक क्षमतेनुसार ठरवला जातो.
५. वर्ष २०२४ मध्ये ४१ देशांवर ७ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी होती. यामध्ये अमेरिका, अर्जेंटिना, मेक्सिको, व्हेनेझुएला इत्यादी देशांचा समावेश होता.