MP Muslim Girls Became Hindu : मध्यप्रदेशात दोन मुसलमान मुलींनी सनातन धर्म स्वीकारला; हिंदु मुलांशी केला विवाह

मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी केला विवाह

खंडवा (मध्यप्रदेश) – येथे दोन मुसलमान मुलींनी सनातन धर्म स्वीकारत दोन हिंदु मुलांशी विवाह केला. खंडवा जिल्ह्यातील प्रसिद्ध महादेवगड मंदिरात हिंदु प्रथा-परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पडला. खांडवा जिल्ह्यातील बेदियान गावात रहाणारी अमरीन खान आता अनुष्का बनली आहे. तिचा विवाह तलवाडिया येथील शुभम राजपूत याच्याशी, तर छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या निशात शेखची आता नवीन ओळख मेघना अशी झाली असून मेघनाचा विवाह छत्तीसगडमधील रहिवासी असलेला कमलजीत सिंह याच्याशी झाला आहे.

खांडवा येथील ऐतिहासिक महादेवगड मंदिरात दोन्ही जोडप्यांचा खास विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे पुजारी राजेश पारा म्हणाले की, दोन्ही मुलींनी पूर्ण भक्तीने आणि संमतीने सनातन धर्म स्वीकारला आहे. या वेळी मेघना म्हणाली की, भगवान श्रीराम आणि सीतामाता यांची कथा लोकांना सनातन धर्माकडे आकर्षित करते.