Donald Trump On India’s Airstrikes : आता मी आशा करतो की, हे सगळे लवकर संपेल ! – डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईकसंदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार, हे लोकांना ठाऊक होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बर्‍याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की, हे अनेक वर्षे नव्हे, तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की, हे सगळे लवकर संपेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कारवाईनंतर व्यक्त केली.

शांततापूर्ण मार्गाने उपाय शोधण्यासाठी भारत आणि पाक यांच्याशी मी चर्चा करणार ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्काे रुबियो

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्काे रुबियो

भारताने पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर ‘एअर स्ट्राईक’ केल्यानंतर भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांना माहिती दिली. त्यानंतर मार्को रुबियो यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी आशा करतो की, हे सगळे लवकर संपावे. या सर्व प्रकरणावर शांततापूर्ण मार्गाने उपाय शोधण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वाशी मी चर्चा करत राहीन.

संपादकीय भूमिका

अमेरिकेवर आक्रमण करणार्‍या ओसामा बिन लादेनचा सूड उगवण्यासाठी २० वर्षे अफगाणिस्तानान सैन्य ठेवणार्‍या अमेरिकेला इतरांना असे सल्ले देण्याचा अधिकार आहे का ? स्वतःच्या देशाचा शत्रू मरेपर्यंत लढाई चालू ठेवायची आणि इतरांना मात्र त्यांच्यातील संघर्ष लवकर संपवण्याचे आवाहन करायचे, हा अमेरिकेचा दुटप्पीपणा आहे !