महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचा आदेश
संग्रहित छायाचित्र
पुणे – शहरातील विविध भागांत अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. नागरिकांना पदपथांवरून चालणेही अवघड होत आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर, तसेच फिरती पथके नियुक्त केली आहेत. तरीही अतिक्रमणे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील कोणत्या भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली त्याचा आढावा (अहवाल) प्रतिदिन सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. (प्रशासनाला आयुक्तांना असा आदेश का द्यावा लागतो ? – संपादक)
वाढत्या अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्तांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा, अशा सूचनाही अतिक्रमण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना केल्या आहेत.